धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 मार्च रोजी दुपारी 2 वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दिनांक 13 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे, दुपारी 2 वाजता सभेस सुरुवात करणे,ही सभा खालीलप्रमाणे पार पडेल, दुपारी 2 ते 2.15 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्राची तपासणी,नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी 2.15 वाजता वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवाराची नावे वाचून दाखवणे,दुपारी 2.15 ते 2.30 वाजता उमेदवारी परत घेणे,दुपारी 2.35 वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे, दुपारी 2.40 वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे,दुपारी 2.40 ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास मतदान प्रथम अध्यक्ष पदासाठी व नंतर उपाध्यक्ष पदासाठी होणार आहे.त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
यानुसार प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच त्याच पध्दतीचा अवलंब करुन जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे.
