धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती संचालित धाराशिव प्रशालेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळ्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांची विक्री करत खऱ्या कमाईचा अनुभव घेतला.

प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन  कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. जाधव, प्रमुख अतिथी सौ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवकार्याविषयी आपले विचार मांडले. आभारप्रदर्शन शिक्षक चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास धाराशिव प्रशाला व याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिरचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य पदार्थाची विक्री करून 'खरी कमाई' चा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सला विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी भेट देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.


 
Top