वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीचे औचित्य साधून कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी (राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना,रेड रिबन क्लब,शारीरिक शिक्षण विभाग व ग्रीन क्लब) छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी आणि बालसंस्कार प्राथमिक विद्यामंदिर वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भगवंत रक्तपेढी बार्शी यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम,मुख्याध्यापक सुहास थोरबोले,प्रा.डॉ अरुण गंभीरे,प्रा.डॉ बालाजी देवकते,प्रा.डॉ अनंत पाटील, प्रा.डॉ दैवशाला रसाळ,प्रा.डॉ रवी चव्हाण ,मुख्याध्यापक संतोष माने,प्रा.के.डी गुंड व प्रा.डॉ नेताजी देसाई उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा.डॉ अरुण गंभीरे यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले. मुख्याध्यापक श्री.सुहास थोरबोले म्हणाले की ,रक्तदान म्हणजे जीवनदान असून रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये 24 तासामध्ये दिलेले रक्त तयार होते आणि एखाद्याचा जीव वाचवू शकतो असे ते म्हणाले. यावेळी प्रथम रक्त दाती कु.साक्षी यादव हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या शिबिरामध्ये एकूण 31 रक्तदात्यांची रक्तदान केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अशोक कदम यांनी केले सुत्रसंचलन प्रा.एम.डी उंदरे यांनी केले तर प्रा.डॉ. नेताजी देसाई यांनी आभार मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा.राजेश उंदरे, प्रा.कृष्णा थोरात, मुकुंद कोळी, अजय जाधव व नवनाथ निकम यांनी परिश्रम घेतले.
