धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील आळणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून जिजाऊंच्या संस्कारक्षम मातृत्वाचे, शिवरायांना घडविण्यातील त्यांच्या भूमिकेचे तसेच समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी योगदानाचे महत्त्व विशद केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करताना, “जिजाऊंसारखी संस्कार देणारी, मूल्यांची शिकवण देणारी आई आजच्या समाजाला अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली ती विद्यार्थ्यांनी साकारलेली राजमाता जिजाऊंची वेशभूषा. या वेशभूषेमुळे संपूर्ण कार्यक्रमात ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. तसेच राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आळणी येथील छावा प्रतिष्ठान यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. यावेळी छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली वीर, अजय देशमुख, अजित वीर, शुभम गाडे, संकेत वीर, विष्णू लावंड, अजय निंबाळकर, बालाजी वीर, अविनाश कदम, निलेश कदम, निखिल वीर, निलेश वीर, निलेश नांदे, निलेश वीर, प्रतीक कदम, स्वप्नील वीर, रोहित तौर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत माने यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिनेश पेठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याससाठी शाळेतील जया नवले, सुमन इंगळे,सखुबाई कदम,स्वाती मुपडे, महादेवी सावळकर, नेहा भंडारे, राजेंद्र दीक्षित, अश्विनी भांगे यांनी परिश्रम घेतले.

