धाराशिव(प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजीनगर रोड,धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वावर तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांवर प्रकाश टाकला. व्ही पी शैक्षणिक संकुलातील कृषी महाविद्यालयामध्ये जिजाऊ जयंती व युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित व्याख्यान तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमासाठी व्ही पी शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी व एसबीएनएम फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, आर.पी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गाझी शेख, एस. पी. पॉलीटेक्निकचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, वेलनेस फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. पूजा आचार्य, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, डेअरी महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी वाघमारे, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, आयटीआयचे व्यवस्थापक प्रा. दत्तात्रय घावटे, लेखापाल योगेश मंडलिक तसेच संकुलातील सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top