परांडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अपघाती दुःखद निधन झाल्याने शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे  महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी श्रद्धांजलीपर आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की प्रशासनावर कडक नजर असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असा नेता पुन्हा होणे नाही.  यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे ,मराठी विभाग प्रमुख डॉक्टर गजेंद्र रंदील, प्रभारी प्राचार्य डॉ.विद्याधर नलवडे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.कृष्णा परभणे यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top