धाराशिव (प्रतिनिधी)-  आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धारूर आणि उपळा भागात प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत खासदार ओमराजे निंबाळाकर आणि प्रख्यात व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी मतदारांशी थेट संवाद साधून विजयाचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी सभेला शिवसैनिकांसह शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुणांची अलोट गर्दी उसळली होती. सभेतील जनसागर पाहून विरोधकांचे धाबे दणाणले असून, या भागात पक्षाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.  वडगाव सिद्धेश्वर गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार लक्ष्मी राजेंद्र जाधव, वडगाव सिद्धेश्वर गण मधून अंकुश शंकर मोरे, चिलवडी गण मधून अंगद राजाराम धावारे व उपळा गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ललित धोंडोपंत सारोळकर, उपळा (मा) गणातून वर्षा प्रमोद पडवळ, वाघोली गणातून विशाल लक्ष्मण शिंदे, हे निवडणूक लढवत आहेत. 

खासदार ओमराजे निंबाळाकर यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारवर प्रखर टीका केली. प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या शैलीदार भाषणातून शिवसैनिकांमध्ये उत्साह भरला. यावेळी सतीश सोमानी, सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, सौदागर जगताप, अमोल मुळे, किरण बोचरे, अण्णा पवार, नेताजी शिंदे, बालाजी गुरव, विश्वजीत गुरव, अण्णा पांढरे, बळीराम कांबळे, विश्वास मोरे, दयानंद सरपाळे, योगेश गरड, चंद्रकांत गांदले आदीसह कार्यकर्ते व नागरीक उपस्थीत होते.

 
Top