मुरुम (प्रतिनिधी)- मुरूम येथील भारत शिक्षण संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरूम अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन भारत शिक्षण संस्थेचे संचालक श्री त्रंबकराव इंगोले यांच्या हस्ते बिरुदेव माळ गणेश नगर येथे करण्यात आले यावेळी भारत शिक्षण संस्था संचालक तानाजी फुगटे माजी प्राचार्य दिलीप इंगोले, सरपंच उषाताई चव्हाण, उपसरपंच सतीश पवार, बाला राठोड, ओम चव्हाण पोलीस पाटील श्रीमती कलावती चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विशेष शिबाराला संबोधित करताना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डी. टी. इंगोले यांनी समाजसेवेसाठी स्वयंसेवकांमध्ये भावना रुजवणे ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडवणे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य हेतू आहे असे मत व्यक्त केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले यांनी स्वयंसेवक यांना संबोधित करताना विशेष शिबिरामध्ये जनजागृती ग्राम स्वच्छता,आरोग्य शिबिर, अंतर्गत रस्ते, महिला मेळावा असे विविध उपक्रम घेण्यात येणार असून त्यातून स्वयं सेवका मध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी मदत होईल व या शिबिराच्या माध्यमातून नेतृत्व गुण, संघ भावना व सामाजिक बांधिलकी निर्माण होईल असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा.प्रसाद इंगोले प्रा शेषेराव राठोड , प्रा वर्षा हुलगुंडे, प्रा प्रकाश चव्हाण प्रा सुजित चिकुंद्रे प्रा भगवंत चौगुले प्रा किशोर कांबळे प्रा इंद्रजीत चौधरी प्रा श्रीकांत शिंदे प्रा विनय इंगळे प्रा रोहन हराळकर अवधूत गुरव, अनिकेत सगट,व स्वयंसेवक उपस्थित होते प्रा. के बी. माने यांनी सूत्रसंचालन व कार्यक्रमाधिकारी गजानन उपासे यांनी आभार मानले.
