धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिवच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने धाराशिव येथील जिजाऊ चौकात अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्रा. रवि सुरवसे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र धावारे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ यांचा विजय असो, तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करण्यात आला.
यावेळी प्रा. रवि सुरवसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विजय गायकवाड, राजेंद्र धावारे, एम.जी. पवार, सी.के. मस्के, विकास काकडे, अमोल गडबडे, ॲड. अजित कांबळे, प्रा. अंबादास कलासरे इत्यादींची उपस्थिती होती.
