तेर(प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा नदीवर शासनाकडून मंजूर झालेल्या  १ कोटी निधीतून उभारण्यात येणाऱ्या घाट बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे तेर परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून भाविक, नागरिक आणि पर्यटकांना मोठा लाभ होणार आहे. नदीकाठावरील घाटामुळे स्नान, पूजन, धार्मिक विधी व उत्सवांच्या आयोजनासाठी सुरक्षित व सुबक व्यवस्था निर्माण होणार आहे. यासोबतच नदी परिसराचे सौंदर्यीकरण, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासही चालना मिळणार आहे. या कामामुळे तेरच्या ऐतिहासिक व धार्मिक वारशाला नवी ओळख मिळून तेरच्या सर्वांगीण विकासात भर पडणार आहे. शासनाच्या विकासाभिमुख धोरणांतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात येणारे हे काम लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणेला योग्य सूचना दिल्या आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी दिली.यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड,  नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी,विष्णू एडके, लोकेश काळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top