तुळजापूर (प्रतिनिधी) - लोकशाही मराठी चॅनलचे संचालक गणेश नायडू यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची सहपरिवार विधीवत पूजा करून दर्शन घेतले. सध्या शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू असल्याने पौर्णिमेच्या दिवशी नायडू कुटुंबीयांना तुळजापूरचे महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांनी मानाचा फेटा बांधून कवड्याची माळ आणि श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश नायडू, लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे संचालक हिना गणेश नायडू, ध्रुमीत गणेश नायडू, अंजनी गणेश नायडू, धाराशिव येथील पत्रकार काकासाहेब कांबळे, विशाल जगदाळे आदी उपस्थित होते.
