कळंब (प्रतिनिधी)- तालुका विधी सेवा समिती, कळंब व शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘बालविवाह : कायदा व त्यावरील उपाययोजना’ या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास कळंब येथील सहदिवाणी न्यायाधीश मा. ए. डी. जाधव मॅडम प्रमुख उपस्थिती म्हणून लाभल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, त्यातील तरतुदी तसेच बालविवाहामुळे समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर व मार्गदर्शक माहिती दिली. कायद्याची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी श्रीमती वर्षा सरवदे मॅडम यांनी बालविवाह रोखण्यासाठी समाजाची भूमिका, कुटुंबाची जबाबदारी आणि उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन करत उपस्थितांना प्रबोधन केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बी. बी. साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ईश्वर राठोड यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ. कमलाकर जाधव, प्रा. जयवंत भोसले, प्रा. डॉ. पी. डब्ल्यू. पावडे, तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा जनजागृतीपर कार्यक्रम अत्यंत यशस्वी व उत्साहात पार पडला.

 
Top