वाशी (प्रतिनिधी)- येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाशी पोलीस स्टेशनचे पोलि स निरीक्षक  शंकरराव शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मच्छिंद्र तात्या कवडे, जे. एस. पी. एम. युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. मधुकर देशमुख, डॉ.दत्तात्रय कवडे, डॉ. सुरेंद्र थोबडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम उपस्थित होते. 

पोलीस निरीक्षक  शंकरराव शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी बोलताना शंकरराव शिंदे म्हणाले की,मी या संस्थेचा विद्यार्थी असून माझ्या पोलिस स्टेशन अंतर्गत शेवटच्या घटकापर्यंत सुरक्षा देण्याचे काम करत राहील.तसेच याप्रसंगी उपस्थित सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. यावेळी वाशी तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉ.कवडे आणि डॉ.थोबडे यांनी युद्ध नको शांतता हवी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शांतता रॅलीचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अशोक कदम यांनी केले,सूत्रसंचालन प्रा.महादेव उंद्रे यांनी तर प्रा.डॉ. अरुण गंभीरे यांनी आभार मानले. प्रजासत्ताक दिन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.रवी चव्हाण,प्रा. राहुल कुलकर्णी, प्रा.राजेश उंदरे,मुकुंद कोळी आणि स्वप्निल शेळकांदे यांनी परिश्रम घेतले. ध्वजवंदन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


 
Top