धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपस्थितांना शपथ देण्यात आली.या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक श्री.बुबासाहेब जाधव,भास्करराव नायगावकर, नामदेव माने,श्रीपती जावळे, बाबुराव तवले,शेषराव बनसोडे व कलावती उंबरे यांची व त्यांचे नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी सर्वश्री शिरीष यादव,संतोष राऊत,उमेश पाटील, स्वाती शेंडे, प्रवीण धरमकर व अरुणा गायकवाड, श्रीमती.पुजार, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, तहसीलदार मृणाल जाधव,प्रकाश व्हटकर,नायब तहसीलदार संतोष पाटील,सचिन पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top