धाराशिव (प्रतिनिधी)-  योग साधनेतील एक महत्त्वाचा प्रकार असलेला सूर्यनमस्कार आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यदायी जीवनशैलीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. नित्यनियमाने सूर्यनमस्कार केल्यामुळे केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाही, तर मानसिक स्वास्थ्यही बळकट होत असल्याचे मत मीनाक्षी मुलिया यांनी व्यक्त आहे.

धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर क्रीडा भारतीच्या वतीने सामूहिक सूर्यनमस्कार घेण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन क्रीडा भारतीच्या देवगिरी प्रांत सहमंत्री मीनाक्षी मुलिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक ऍड रवींद्र कदम, प्रचारक राघवेंद्र, देवगिरी प्रांत क्रीडा केंद्र प्रमुख प्रविण गडदे, क्रीडा भारती जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष रामकृष्ण खडके, जिल्हा मंत्री माउली भुतेकर, युवक प्रमुख योगेश थोरबोले, क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार, सूर्यनमस्कार जिल्हा संयोजक तेजस अलसेट, ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरराव वाघोलीकर, कुणाल निंबाळकर, कराटे संघटनेचे सचिव मनोज पतंगे, तायक्वॉनदो संघटनेचे सचिव राजेश महाजन, कुस्ती कोच गणेश सापते, स्केटिंग कोच यशोदीप कदम आदींसह विविध एकविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू आणि पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्तीथी होती.   

सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात ऍथलेटिक्स, योगासन, आर्चरी, ज्युडो, स्केटिंग, रिंग टेनिस, कराटे, तायक्वॉनदो, कुस्ती, मॉडर्न पेन्टयाथलॉन आदी क्रीडा प्रकारातून 453 खेळाडू, मार्गदर्शक, पालकांनी सहभाग नोंदविला असून यावेळी विविध क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा भारतीसह क्रीडा प्रेमी, विविध एकविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, कोचेस, खेळाडूंनी परिश्रम घेतले.

 
Top