धाराशिव (प्रतिनिधी)- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत असताना केवळ एक दिवस जयंती साजरी करून चालणार नाही तर युवकांच्या अंगी असलेले सुप्त गुण बाहेर पडावेत. त्यांच्या मध्ये असलेल्या गुणांना सादर करण्याची संधी मिळावी. यासाठी 12 जानेवारी ते 19 जानेवारी हा विवेकानंद सप्ताह साजरा केला जातो. असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा सहविभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी विवेकानंद सप्ताह उद्घाटन प्रसंगी केले.
धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून मराठवाडा सह विभाग प्रमुख डॉ. जयसिंगराव देशमुख हे लाभले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख हे होते. डॉ. संदीप देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेकानंद चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.वैभव आगळे यांनी केले. तर आभार डॉ.बालाजी गुंड यांनी मानले.
