धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे भारत देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे गायन केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी संगीत कवायत, डंबेल्स कवायत, झेंडा कवायत, स्काऊट क्लॅप, तसेच विद्यार्थी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याचबरोबर देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, शिस्त व एकतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी प्रास्ताविक करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व तसेच भारतीय संविधानातील मूल्यांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास संतोष चौगुले, शाम लावंड, हरिदास म्हेत्रे, शुभम म्हेत्रे, संजीवनी पौळ, अफसाना शेख, अनिता पौळ, अक्षय कदम, गणेश निंबाळकर, ज्ञानेश्वर निंबाळकर, निलेश निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर यांच्यासह असंख्य पालक उपस्थित होते महिला पालकांची उपस्थिती लक्षनीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हनुमंत माने यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती वीर राधाबाई यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे साजरा करण्यात आलेला 77 वा प्रजासत्ताक दिन हा प्रेरणादायी, शिस्तबद्ध व संस्मरणीय ठरला.

 
Top