धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राज्याच्या राजकीय पटलावरून अचानक नाहीसे होणे ही सर्वांसाठीच अतिशय धक्कादायक बातमी आहे. गेल्या दहा वर्षांत ते विविध कारणांनी महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. त्यांची प्रशासनावरील पकड आणि कामकाजाची उत्तम समज नावाजली गेली. त्यांच्या कामाचा उरक आणि ऊर्जा दांडगी होती. मात्र, अलीकडच्या काळात त्यांची वादग्रस्त विधाने आणि वादग्रस्त राजकीय खेळ्या यांनी त्यांचे कर्तृत्व आणि कारकिर्द झाकोळली गेली. पवार कुटुंबातले ते महत्वाचे आधारस्तंभ होते. त्यांचा असा दुर्दैवी अंत झाला, हे दुःखद आहे. राजकीय नेत्यांचा अपघाती मृत्यू हा लोकांच्या मनात कायम संशय निर्माण करतो. अजितदादा पवार यांच्या या अपघाती निधनाची चौकशी होऊन लोकांच्या शंकांचे निराकरण व्हायला हवे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी  सचिव, डॉ. स्मिता शहापूरकर यांनी दिली.

 
Top