वाशी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या निधनाच्या दुःखद वृत्ताच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असताना, दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7.00 वाजता वाशी शहरात त्यांना सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

अजित दादा पवार यांच्या निधनाची बातमी कळताच वाशी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली शोकभावना व्यक्त करत संपूर्ण बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. दिवसभर शहरात शांतता आणि हळहळ व्यक्त होत होती. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सायंकाळी बाजारपेठ पुन्हा सुरू करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली. या शोकसभेला विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. अनेकांनी त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या. शेवटी सर्वांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. 


 
Top