भूम (प्रतिनिधी)- भूम पंचायत समितीच्या दहा जागेसाठी 41 उमेदवार रिंगणात तर जिल्हा परिषद गटाच्या पाच जागेसाठी 25 उमेदवार रिंगणात राहिले आहेत त्यामुळे जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत तर पंचायत समिती गणात काही ठिकाणी तिरंगी तर चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे आज सकाळी उमेदवारी माघार घ्यावयाच्या अखेरच्या दिवशी अपक्षासह इतर उमेदवार यांची मोठी गर्दी दिसुन आली दरम्यान शिंन्दे सेनेकडून जिल्हा महिला कमेटी अध्यक्षा अर्चना दराडे यांनी वालवड तर रुपाली समाधान सातव यांनी सुकटा गटातुन अखेर पक्षाचा आदेश आसल्याचे सांगत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज मागे घेतला माजी मंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर विश्वासु आसलेले समाधान सातव यांच्या पत्नीस शिंन्दे शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता विधानसभा निवडणुकीत सातव यांच्या देवळाली गावातुन माजी मंत्री यांना 500 मताधिक्य मिळाले होते याच मताधिक्यमुळे सावंत हे कमी अधिक फरकाच्या मतांनी विजयी झाले होते त्यामुळे पक्ष त्यांना उमेदवारी नक्की देईल असे चित्र सुकटा गटातील मतदारात होते मात्र पक्षान उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु शेवटी पक्षाचा आदेश मानत शक्तिप्रदर्शन करत अर्ज वापस घेतला आहे त्यामुळे आता शिंन्दे सेनेच्या विजयमाला भाऊसाहेब मारकड यांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित झाली आहे तर शिवसेना महिला अघाडी अध्यक्षा अर्चना ताई दराडे यांनी पक्षाकडे वालवड गटासाठी मागणी केली होती त्यांनाही पक्षान उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानाही माजी मंत्री सावंत यांच्या आदेशान रिंगणातुन माघार घेतली आसल्याचे शक्तीप्रदर्शन करत सांगीतले गण आणी गटातील उमेदवार ईट गटातून वर्षा गिते(भाजप),स्नेहल सुनिल भोईटे(शिवसेना),शुभांगी सुनिल देशमुख (राष्ट्रवादी),सगुणा अशोक सोन्ने (शिवसेना ठाकरे),सुकटा गटातून विजयमाला भाऊसाहेब मारकड(शिवसेना), सुप्रिया संजीव पाटील(राष्ट्रवादी), लक्ष्मी बबन जानकर(शिवसेना ठाकरे), धनश्री रणजीत हापटे(भाजपा), श्वेता सुधाकर हाके(रासप), पाथरूड गटातून रामकिसन गव्हाणे(शिवसेना), अमोल(दत्ता) भोरे(राष्ट्रवादी काँग्रेस), शंकर नागरगोजे(शिवसेना ठाकरे),सिताराम वनवे(भाजपा),विठ्ठल सुरवसे(अपक्ष), वालवड गटातून उषा कांबळे (राष्ट्रवादी), जयश्री काळे (शिवसेना), लता गोरे (भाजपा), उर्मिला वनवे(शिवसेना ठाकरे), आष्टा गटातून साधना अंधारे (शिवसेना ), महादेव खैरे (राष्ट्रवादी), नितीन जाधव (भाजपा), झीनत सय्यद(शिवसेना ठाकरे),रवींद्र लोमटे (रा.स.द.आर) यांच्यात लढत होणार आहे. पखरुड गणातून प्रियंका रणबागुल(वंचित बहुजन आघाडी), राजकन्या लिमकर (शिवसेना), सागरबाई अनुभले (भाजपा), संगीता नलवडे (शिवसेना ठाकरे),ईट गणातून बाळासाहेब खरवडे (राष्ट्रवादी), प्रवीण देशमुख (शिवसेना), शरद चोरमले (भाजपा), श्रीमंत डोके (शिवसेना ठाकरे),शिवाजी चव्हाण (म न से), सुकटा गणातून सुरज नाना मदने (रा स प),भगवान बांगर (शिवसेना ठाकरे), दत्ता लवटे (राष्ट्रवादी), कृष्णा गोयकर (शिवसेना),सारिका मारकड(अपक्ष), आरसोली गणातून प्रशांत मुंडेकर (शिवसेना), कुमार (राहुल) तांबे- पाटील(राष्ट्रवादी), लिंबाबाई लोमटे (रा.स.द.आर), सुनंदा बनसोडे(अपक्ष),पाथरूड गणातून प्रदीप शेळके (राष्ट्रवादी अप),चेतन बोराडे (शिवसेना ठाकरे), समाधान भोरे (शिवसेना), विठ्ठल पन्हाळे (भाजपा), आंबी गणातून प्रियंका गटकळ (राष्ट्रवादी), सरिता नागरगोजे( शिवसेना ठाकरे),उर्मिला शिंदे (शिवसेना), रतन गायकवाड (भाजपा), वालवड गणातून वैशाली बारस्कर (राष्ट्रवादी), साधना सुबुगडे (शिवसेना), रुक्सना सय्यद (शिवसेना ठाकरे), स्वाती तनपुरे (भाजपा), चिंचोली गणातून अगरावती गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), श्रीलता लोखंडे (शिवसेना), ज्योती आडागळे (शिवसेना ठाकरे), स्नेह मिसाळ (भाजपा), आष्टा गनातून पूजा ढगे (शिवसेना),अश्विनी कदम (राष्ट्रवादी), लीलावती ढगे (शिवसेना ठाकरे), माणकेश्वर गणातून मनोज अंधारे (राष्ट्रवादी), बालाजी गुंजाळ (शिवसेना), सुदाम पाटील (भाजपा), बापू माळी (शिवसेना ठाकरे) यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.