धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार सर्व कार्यालय विभाग प्रमुख तसेच सर्व नागरिकांना कळविण्यात येते.मात्र जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुक 2026 ची आदर्श आचारसंहिता दिनांक 13 जानेवारी 2026 पासून लागू झाली आहे.जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 ची आदर्श आचारसंहिता 9 फेब्रुवारी 2026 पर्यंत लागू राहणार आहे.
त्याअनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू कालावधीत येत असल्यामुळे दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.