भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या पॉलिटेक्निकच्या 2025 च्या हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये बार्शी येथील भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालय (बीआयटी कॉलेज ) मधील डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा यावर्षीही देखील कायम राखली असून तीनही अभ्यासक्रमाचा तिसऱ्या वर्षाचा निकाल 100% लागला आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये - प्रथम वर्ष -प्रथम क्रमांक - श्रीहर्ष कवडे 83.18%,द्वितीय क्रमांक - अजय खुले -83.06% ,तृतीय क्रमांक - धीरज थोरात - 80.35% द्वितीय वर्ष - प्रथम क्रमांक -अनुष्का काळे -82.94%, द्वितीय क्रमांक - अंजली फडकरी 77.29% तृतीय क्रमांक - प्रतिज्ञा कवडे -75.18%
तृतीय वर्ष- प्रथम क्रमांक -श्रुती सातपुते -87.11% ,द्वितीय क्रमांक - वैभवी कांबळे -83.11%, तृतीय क्रमांक - वैष्णवी पाटील -82.11% इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिप्लोमा मध्ये
प्रथम वर्ष - प्रथम क्रमांक - रिवा गाढवे -85.41%,द्वितीय क्रमांक - अमृता घोगरे -84.00%, तृतीय क्रमांक - सानिया फकीर व अनुष्का हागवणे - 82.59% द्वितीय वर्ष - प्रथम क्रमांक - अंकिता कांबळे -89.67%, द्वितीय क्रमांक -वैष्णवी धारूरकर -85.67%,तृतीय क्रमांक - प्रशांत जगदाळे - 85.33%
तृतीय वर्ष - प्रथम क्रमांक - श्रुष्टि व्हळे -91.88%,द्वितीय क्रमांक - पृथ्वीराज बोबडे -90.00%,तृतीय क्रमांक - रोहन सलगर व प्रदीप मोरे - 88.59%
मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये -प्रथम वर्ष- प्रथम क्रमांक ऋतुराज अरगडे 78.35% ,द्वितीय क्रमांक आरती गव्हाणे 76.47% तृतीय क्रमांक भारत येमाडे 76.12% द्वितीय वर्षात - प्रथम क्रमांक -यश नेमाने याने 87.78% द्वितीय क्रमांक साहिल जाधव 83.11% तृतीय क्रमांक शिवम अरगडे याने 78.44% . तृतीय वर्षात - प्रथम क्रमांक अभिजित सोनावणे 92.71% द्वितीय क्रमांक -नवनाथ भिल 90% तृतीय क्रमांक -अंकिता पवार 89.77%
सर्व यशस्वी विद्यार्थ्याना संकुल संचालक ऋतुराज सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.एच.व्ही. शेटे सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जेएसपीएम ग्रुपचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव सावंत सर , महाविद्यालयाचे सचिव पृथ्वीराज सावंत ,संकुल संचालक ऋतुराज सावंत , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.व्ही.शेटे सर ,यांच्यासह सर्व विभागप्रमुख ,प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
