धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने दि.01 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले.त्याच अनुषंगाने 27 जानेवारी 2026 रोजी आरोग्य विभागाच्या सहकार्याने अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे जिल्हा शल्य चिकित्सक,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालक व मालक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे चालक, कार्यालयात आलेले शिकाऊ व पक्के लायसन उमेदवार तसेच सर्व नागरिकांसाठी अवयवदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांनी उपस्थित उमेदवार व नागरिकांना मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.विक्रम राठोड, डॉ.शिवाजी फुलारे व डॉ.अर्चना गुट्टे यांनी अवयवदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक अनिल खेमनार, पूनम पोळ, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुणाल होले, महेबूब मुसा सय्यद, वाघ, अधिक्षक डी.के.लोंढे, नरसिंह कुलकर्णी, ए.आर.राऊत, बालाजी वाघमारे, रमेश कऱ्हाळे, संध्या राणी गवाड, करिष्मा लोहार तसेच शिपाई दत्तू सरपे, एस.जी.काळे आदी उपस्थित होते.क ार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुणाल होले यांनी आभार प्रदर्शन केले.

 
Top