वाशी (प्रतिनिधी)-  वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत 69 जणांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले तर 43 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 102 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज परत घेण्याचा 27 जानेवारी हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी पारगांव, पारा व तेरखेडा या तिन्ही जिल्हा परिषद गटातून 30 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. या  गटामधे एकूण 45 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या बरोबरच पारगांव, सरमकुंडी, पारा, बावी, तेरखेडा व इंदापूर या सहा गणात 39 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. या सहा गणात एकूण 67 उमेदवार होते.


 
Top