धाराशिव (प्रतिनिधी)-  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मराठवाडा विभागात दि.12 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत विवेकानंद सप्ताह अंतर्गत शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे निबंध, वक्तृत्व, चित्रकला, सुगम गायन,समुह गायन, कराओके आणि टॅलेंट सर्च स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांमधून प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय स्पर्धाकांची विभागीय स्पर्धांमध्ये निवड करण्यात आली,या विभागीय स्पर्धा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या,या स्पर्धांचे उद्घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले तर समारोप नानासाहेब पाटील, सदस्य महाविद्यालय विकास समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला,सदर स्पर्धांमध्ये अनुक्रमे निबंध स्पर्धेत उच्च प्राथमिक गटामधुन कु वाघमोडे प्रतीक्षा आप्पासाहेब,श्री विठ्ठलराव शिंदे मा.प्रशाला निमगाव प्रथम, माध्यमिक गटातून शेळके स्नेहल चंद्रकांत,वि.रा.शिंदे मा.प्रशाला निमगाव,कु.ढगारे सृष्टी रामलिंग, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव, महाविद्यालयीन गटातुन घाडगे वैष्णवी सुर्यकांत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यापक विद्यालय धाराशिव, गुरुदेव कार्यकर्ता गटातुन शाम विष्णू मोरे, विठ्ठलराव शिंदे प्रशाला निमगाव भागशाळा,सापटणे हे सर्व सहभागी निबंध स्पर्धेत प्रथम आले, तसेच समुह गायनामध्ये माध्यमिक गटातून श्री यशवंत विद्यामंदिर कामेगाव प्रथम, समुह गायन महाविद्यालयीन गटातुन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यापक विद्यालय नळदुर्ग प्रथम, वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गटात तळेकर सिध्दी नितीन, उत्तरेश्वर मा विद्यालय केम,प्रथम, माध्यमिक गट गायकवाड अंशुला हनुमंत, श्री विठ्ठलराव शिंदे मा प्रशाला निमगाव,प्रथम, उच्चमाध्यमिक गटातून माने संजीवनी यादव, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव,प्रथम, महाविद्यालयीन गटातुन लाटे अमोल चंद्रकांत, श्रीमती सुशीलादेवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन, धाराशिव प्रथम गुरुदेव कार्यकर्ता गटातुन प्रा विवेक कोरे, अध्यापक विद्यालय तुळजापूर,प्रथम, चित्रकला स्पर्धांमध्ये उच्च प्राथमिक गटातुन गणगे ओम परमेश्वर,श्री कुर्मदास विद्यामंदिर लउळ, माध्यमिक गटातून, नलवडे कृष्णा महेंद्र, श्री कुर्मदास विद्यामंदिर लउळ प्रथम, उच्च माध्यमिक गटातून कनिचे सावली भानुदास, नेताजी सुभाष विद्यालय केत्तुर प्रथम, महाविद्यालयीन गटातुन तिकोणे दिव्या राजदिप,श्री तुळजाभवानी अध्यापक महाविद्यालय तुळजापूर,प्रथम, गुरुदेव कार्यकर्ता गटातुन थोरात मनिषा चांगदेव, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव प्रथम,सुगम गायन स्पर्धेत काळे संध्या भिमाशंकर, श्री हनुमान विद्यामंदिर बंकलगी,प्रथम, माध्यमिक गटातून,कचरे गणेश संतोष, रामानंद विद्यामंदिर काजळा,प्रथम,उच्च माध्यमिक गटातून स्वामी पूजा गुरुनाथ, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव,प्रथम, महाविद्यालय गटातून,सुतार तेजस्विनी मनोज,रा प महाविद्यालय धाराशिव, प्रथम, कराओके स्पर्धांमधून उच्च माध्यमिक गट, क्षीरसागर सार्थक धनाजी , रामानंद विद्यालय काजळा,प्रथम, महाविद्यालय गटातून वाघमारे क्रांती सचिन,रा प महाविद्यालय धाराशिव प्रथम, गुरुदेव कार्यकर्ता गटातुन प्रा शेंडगे संजय,रा प महाविद्यालय धाराशिव प्रथम, टॅलेंट सर्च स्पर्धांमधून नलवडे राजनंदीनी सुनील,श्री कुर्मदास विद्यामंदिर लउळ प्रथम, माध्यमिक गटातून दुरुगकर प्राजक्ता देशभूषण,वि रा शिंदे हायस्कूल तुळजापूर प्रथम, उच्च माध्यमिक गटातून पवार राजेश राजेंद्र, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव यांनी प्रथम क्रमांक पटकाविले, सर्व विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले,व पुढील स्पर्धांकरीता शुभेच्छा दिल्या, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ वैभव आगळे, डॉ बालाजी गुंड, यांच्या समवेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top