धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर विद्यापीठाचा 32 वा नामविस्तार दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर सतीश कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले होते. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख आणि डॉक्टर सतीश कदम यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन करण्यात आले होते.. कनिष्ठ विभागाचे उपप्रचार्य बबन सूर्यवंशी यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक विवेकानंद चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी डॉ. बालाजी गुंड,कार्यालयीन प्रबंधक सुनील कांबळे, अधीक्षक सुभाष पिंगळे आदींसह सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
