धाराशिव (प्रतिनिधी)- येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती कमलताई नलावडे, संस्था सदस्य शेषाद्री डांगे, मंजुषा सुसर, मुख्याध्यापिका अर्चनाताई शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चनाताई शितोळे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी लेझीम, डंबेल्स, झेंडे, घुंगरू काठी आदींवरील कवायत प्रकार सादर केले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 26 जानेवारी निमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शेवटी प्रभात फेरी व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top