धाराशिव (प्रतिनिधी)- नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात सुलभता यावी,वेळ व खर्च वाचावा तसेच शासकीय सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने दरमहा तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमामुळे वाहन नोंदणी, परवाने,विविध अर्ज प्रक्रिया,दुरुस्ती व मार्गदर्शन यासाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्याची गरज राहत नाही.
या अनुषंगाने जानेवारी 2026 महिन्यातील वाढीव शिबीर कार्यालय तालुका कळंब येथे 19 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे.हे शिबीर त्या दिवशी नियोजित ठिकाणी तालुका कळंब येथे पार पडणार असून तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये वाहन चालक परवाना,वाहन नोंदणी,हस्तांतरण, दुरुस्ती,विविध प्रमाणपत्रे,शुल्क भरणे तसेच परिवहन विभागाशी संबंधित अडचणींचे निराकरण एका ठिकाणी करता येणार आहे.त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून कार्यालयीन कामासाठी होणारी धावपळ कमी होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी कळंब येथे आयोजित शिबीर कार्यालयाचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.