तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री.तुळजाभवानी दर्शनासाठी भाविकांची रविवार प्रचंड गर्दी झाली होती. शनिवार, रविवारच्या सलग सुट्ट्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी दर्शणार्थ प्रचंड गर्दी होत आहे. रविवारी धर्मदर्शन, मुखदर्शन, दर्शन मंडपातील रांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या. सध्या तीर्थक्षेत्र तुळजापूरात थंडीत वाढ झाली आहे. तरीही भाविक पहाटे श्री तुळजाभवानी दर्शनार्थ येत आहेत. सकाळी नऊ नंतर भाविकांच्या गर्दीत प्रचंड वाढ झाली. ती सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथे होते. भावीक खाजगी वाहनाने मोठ्या संख्येने येत असल्याने वाहनतळे भाविकांच्या वाहनांनी गच्च भरून जात आहेत. तर रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. तीर्थक्षेत्र तुळजापूर भाविकांनी आज फुलून गेले होते. बाजारपेठेतही भाविकांचीमोठी गर्दी झाली होती.

