भूम (प्रतिनिधी)-  नगरपालिका निवडणुकीत आमच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन अहोरात्र प्रयत्न केले. तरीही जनतेने आम्हाला 51 टक्के कौल देऊन विरोधकांना चपराक लगावली आहे. सात हजारांहून अधिक मते मिळवून नगराध्यक्षपद आणि सहा नगरसेवक निवडून दिल्याबद्दल आम्ही मतदारांचे ऋणी आहोत. जरी आमच्या 14 जागांवर पराभव झाला असला, तरी त्याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण करून नवनिर्वाचित अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,“ असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व नूतन नगराध्यक्ष संयोगीता गाढवे यांनी केले.

आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्पूर्वी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सहा नगरसेवकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पत्रकार परिषदेत बोलताना संजय गाढवे पुढे म्हणाले की, “निवडणुकीत मिळालेला 51 टक्के मतांचा कौल हा आमच्या कामावर जनतेने टाकलेला विश्वास आहे. ज्या जागांवर आमचा पराभव झाला, तिथे नक्की काय कमी पडले, याचे आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू. पराभवाने खचून न जाता, जनतेने दिलेल्या या कौलाचा आदर करून आम्ही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सहा नगरसेवकांच्या सहकार्यातून शहराच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे हीच आमची प्राथमिकता असेल.यावेळी संजय गाढवे व संयोगीता गाढवे, प्रविण रणबागुल, संजय साबळे, अर्चना दराडे, भागवत शिंदे आणि आलमप्रभु शहर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top