धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नसून ज्ञानाचे प्रतीक आहेत असे प्रतिपादन प्रा. महेंद्र चंदनशिवे यांनी केले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्राचार्य डॉ संदीप देशमुख व मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. महेंद्र चंदनशिवे म्हणाले की, पुढे ते म्हणाले की,6 डिसेंबर 1956 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्या दिवशी एकुण 149 देशाचे ध्वज खाली घेतले गेले होते. माणसं धर्माने नव्हे तर स्वकर्तृत्वाने मोठे होत असतात. भारतातील अनेक चळवळीचे जनक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संदीप देशमुख म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेची पूजा करणारे व्यक्तीमत्व होते. पूरोगामी विचारांचा भारत घडविण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 

यावेळी राजेंद्र धावारे,सेवा निवृत्त मुख्याध्यापक, काशीनाथ वाघोलीकर, सेवा निवृत्त मुख्याध्यापक, सिद्राम वाघमारे सेवानिवृत्त सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ मंगेश भोसले, प्रा. राजा जगताप, डॉ सी. आर .दापके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा डॉ दत्तात्रय साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले. 

 
Top