धाराशिव (प्रतिनिधी)- विशाखापटनम येथे चालू असलेल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत रोलर हॉकी प्रकारातून धाराशिवच्या श्रीलेश शिंदे याने कास्य पदक पटकावले असून तो कॅडेट वयोगटातून महाराष्ट्र संघातून खेळत होता.
भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या अधिपत्याखाली आंध्र प्रदेश राज्य रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत 30 वर्षानंतर प्रथमच मुलांच्या महाराष्ट्राच्या संघाने कास्य पदक पटकावले आहे. राज्याच्या संघास कास्यपदक विजयासाठी धाराशीव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचा खेळाडू श्रीलेश शिंदे याची उत्क्रुष्ट खेळी महत्वपूर्ण ठरली असून त्याला धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, प्रशिक्षक कैलास लांडगे, अजिंक्य जाधव आणि यशोदीप कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
