उमरगा (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या निलंबनाबाबतचे एक पत्र सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जात आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्यावतीने कोणतेही अधिकृत पत्र प्रसिध्दीस दिले नाही किंवा सोशल मिडियावर कोणतीही घोषणा केली नाही असे असताना सोशल मिडिया व इतरत्र एका बनावट पत्राद्वारे निलंबन केल्याचे सांगितले जात आहे. सदर पत्र बनावट असून संबधितांविरूध्द कारवाई करणार असल्याची माहिती उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

बनावट किंवा विकृत माहितीचा जाणीवपूर्वक प्रसार, संघटनात्मक व्यत्यय आणण्याचा कोणताही प्रयत्न किंवा युवक काँग्रेसची संस्थात्मक अखंडता आणि सार्वजनिक विश्वासार्हता नष्ट करण्याच्या उद्देशाने केलेली कोणतीही कृती ही संघटनेविरुद्ध गंभीर उल्लंघन मानली जाईल. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यासाठी, अशी दिशाभूल करणारी सामग्री तयार करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी जबाबदार असलेल्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली जाईल. 

समितीच्या निष्कर्षांवर आधारित, कठोर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल. भविष्यात असे कोणतेही गैरवर्तन झाल्यास अशाच उपाययोजना लागू केल्या जातील असे सांगण्यांत आले. या पञकार परिषदेला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे, विजय वाघमारे, एम ओ पाटील, दादासाहेब गायकवाड, रेखाताई सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, ॲड . पोतदार, ॲड. सगर, मधुकर यादव, विजय दगडे, बाबा मस्के, विशाल काणेकर, सोहेल इनामदार यांची प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होती.

 
Top