धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज धाराशिव येथे सामाजिक समरसता मंच, केसरीया प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात अनेक महिला, पुरुषांनी तसेच युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. सोलापूर इथल्या डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात धाराशिव शहरातील जवळपास 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केसरीया प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर हर्षल डंबळ,सामाजिक सद्भाव विभागाचे एडवोकेट सचिन सूर्यवंशी, सामाजिक समरसता मंचाचे तुकाराम डोलारे,शंकर शेटे,राजेंद्र कापसे, यशवंत शहापालक, श्रीबल कांबळे, सचिन केंगार,कृष्णा मसलेकर, शशांक ढेंबरे, निखिल शेंडगे, अर्जुन बारंगुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
