मुरुम( प्रतिनीधी)-  दिनांक 16 डिसेंबर 2025 अतनूर केंद्राची माहे डिसेंबर २०२५ ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावणकोळा येथे पार पडली यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी  श्री के पी बिराजदार साहेब होते, केंद्रप्रमुख मीनाताई पाटील मॅडम, केंद्रीय मुख्याध्यापक कदम मॅडम साधन व्यक्ती व तज्ञ मार्गदर्शक श्री पेद्देवाड सर, सुलभक श्री गोपीनाथ केंद्रे सर, बंडरे सर व सर्व केंद्रातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद मरसांगवी शाळेतील कबड्डीचा संघ राज्य स्तरावर गेल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावण कोळा शाळेच्या वतीने संघाचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला व शिक्षण परिषदेत अतनूर केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात आले, शिक्षण परिषदेच्या नियोजनाप्रमाणे सर्व तासिका घेण्यात आल्या सकारात्मक शिस्त या विषयावर श्रुत लेखनाविषयी श्री गोपीनाथ केंद्रे सरानी सविस्तर माहिती सांगितली तर अपूर्णांक संकल्पना व उपयोजन यावर्षी श्री बंडरे सरांनी मार्गदर्शन केले उजास उपक्रम व मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन श्री गोपीनाथ केंद्रे सरांनी केले . मध्यंतरामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावण कोळा शाळेच्या वतीने स्वादिष्ट भोजनाची सोय करण्यात आली होती. तेव्हा सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला नंतर प्रशासकीय माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सरांनी तसेच केंद्रप्रमुख मीनाताई पाटील मॅडम कडून व केंद्रीय मुख्याध्यापक कदम मॅडम कडून सांगण्यात आली खेळीमेळीच्या वातावरणात ही शिक्षण परिषद पार पडली शेवटी आभार राजू नागरगोजे सरांनी मानले.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top