मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, येथील वाणिज्य विभाग कॉमर्स असोसिएशन च्या विद्यार्थ्यांकडून दिनांक 08.12.2025 रोजी इंडस्ट्रीयल वीजीट करण्यात आली. भेट देण्यासाठी एकूण 60 विद्यार्थी आणि 6 प्राध्यापकांचा समावेश होता. या भेटी द्वारे विद्यार्थ्यांना एखादा उद्योग कसा उभा करता येईल आणि त्यासंबंधी येणाऱ्या अडचणी कशा सोडवता येतील या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. औद्योगिक भेटीचे चे मार्गदर्शन प्राचार्य डॉ संजय अस्वले सर आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ अजित अष्टे सर यांच्याकडून करण्यात आले. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या 5 उद्योगांचे उद्योजकाकडून सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्याकडून उद्योजकांची मुलाखत घेण्यात आली. याप्रसंगी डॉ खंडू मुरळीकर, डॉ विजय मुळे, प्रा. अक्षता बिरादार, प्रा.संध्या चौगुले, प्रा. विद्या गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
