कळंब (प्रतिनिधी)- येथील बस स्थानकावर हरवलेला महागडा मोबाईल वाहतूक नियंत्रक एस . व्ही . सारुक यांना दि . ६ रोजी सकाळी सापडला . सापडलेला मोबाईल वाहतूक नियंत्रक यांनी कंट्रोल केबिनमध्ये आणून ठेवला काही वेळाने संबंधित मोबाईल धारकाचा फोन आल्याने त्यांना तो कंट्रोल केबिनमध्ये आहे असं सांगण्यात आले . त्यावरून त्यांनी तो मोबाईल त्या मालकाला परत केलं हा मोबाईल आसुतोष बाराते रा . बारातेवाडी ता . कळंब येथील प्रवाशाचा होता तो वाहतूक नियंत्रक सारूक यांनी प्रामाणिकपणे तो परत केला त्यांच्या या प्रामाणिक ते बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .
