धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन बुद्ध वंदना घेण्यात आली. प्रसेन्ना ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. महिला मंडळ,भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, मतदार जनजागरण समिती, पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव,राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था अन्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी महामानवास अभिवादन केले. भारतीय संविधान उद्देशिका व विश्लेषण प्रत वाटप करण्यात आल्या. तसेच नायाब तहसीलदार महादेव शिंदे,नायाब तहसीलदार स्वामी, मुख्याधिकारी निता अंधारे यांनी महामानवास अभिवादन केले. नायाब तहसीलदार महादेव शिंदे यांनी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे,प्रवीण जगताप, संजय गजधने, सिध्दार्थ बनसोडे,अंकुश उबाळे, बलभीम कांबळे, बाळासाहेब गुळीग, अमर आगळे, रमेश कांबळे,नवनाथ वाघमारे, बौध्दाचार्य बाबासाहेब बनसोडे,बौध्दाचार्य धनंजय वाघमारे, नागनाथ गोरसे, ॲड.अनुरथ नागटिळक,बापु कुचेकर, श्रीकांत गायकवाड, समाधान मते,अतुल लष्करे,विशाल घरबुडवे,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतीफ,एम डी देशमुख,किसन घरबुडवे,रवि सुरवसे,ॲड अजय वागाळे,पांडुरंग राऊत,विजय गायकवाड,अशोक बनसोडे,बापु बनसोडे,सुधाकर माळाळे,चालक मालक मोटार संघटनेचे उत्तम घरबुडवे,सुधाकर लष्करे अन्य इतर उपस्थित होते.
