उमरगा (प्रतिनिधी)- आष्टा जहागीर येथील अखंड हरिनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा श्री शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा सप्ताहाची सांगता सामाजिक व धार्मिक उपक्रमाने करण्यात आली.
तालुक्यातील आष्टा जहागीर येथील संतयोगी दामोदर महाराज मठ संस्थांनचे मठाधिपती 1008अवधुतपुरी महाराज यांच्या अधिपत्याखाली सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,तथा श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता दि.3 रोजी सकाळी 8वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाचि गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक हलकी,टाळ,र्मदंगाच्या गजरात भाविक भक्तांच्या समवेत काढण्यात आली. त्या भक्तीमय सोहळ्यात महिलांनी डोक्यावर तुळशीचे र्वंदावन घेऊन सहभागअकर्षक ठरला होता. दुपारी 2 ते 4 मठाधिपती 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांचे काल्याचे किर्तन, सकाळी11ते 4 श्रीकृष्ण रक्त पेठीसंस्थेचे रक्दान शिबिर ठेवण्यात आले होते 21 रक्त दात्यांंनी रक्तदान करुन या विविध उपक्रमांनी व सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान ग्रामदैवत मह्सोबा देवस्थान येथे गोपाळ काला दहिहंडी ने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
यावेळी सरपंच सतिष जमादार, उपसरपंच बापुराव गायकवाड,तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष जिवन जाधव, माजी सरपंच राजेंद्र गायकवाड, माजी उपसरपंच राधाताई गायकवाड, पोलीस पाटील महेश जाधव,माजी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तुकाराम गायकवड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रविकुमार मुळेभजनीमंडळाचे अध्यक्ष कमलाकर गायकवाड, विणेकरी रमेश गायकवाड,उमेश जाधव,जयवंत (सोनाजी)जाधव ,विश्वंभर जाधव, हिरानाथ गायकवाड, पांडुरंग गायकवाड, महादेव पाटील, अविनाश कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी,गायणचार्य ज्ञानेश्वर येवते मळगीवाडी ,अवधुत तरमोडे मळगी, आदिसह पंचक्रोशीतील भाविक भक्त,दामोदर मिञमंडळ,ग्रामस्थ उपस्थित होते.
