भुम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री राम वारे यांनी नुकताच भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टी परिषद सदस्य श्री बाळासाहेब क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, OBC जिल्हा उपाध्यक्ष श्री शरद चोरमले, व्यापार आघाडीचे श्री चंद्रकांत गवळी, शहराध्यक्ष श्री बाबासाहेब वीर,युवा शहर अध्यक्ष श्री मुकुंद वाघमारे कामगार मोर्चा शहराध्यक्ष श्री महादेव शेंडगे, अ जा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री प्रदिप साठे, उदयोग आघाडी प्रमुख श्री रमेश बगाडे सोशल मीडिया शहराध्यक्ष श्री सिद्धार्थ जाधव, भाजपचे शहर चिटणीस श्री निलेश शेळके, श्री नितीन साठे सोशल मीडिया प्रमुख श्री सुजित वेदपाठक, नवनाथ रोकडे आदी उपस्थित होते.
