धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुलातील श्री साई जनविकास कृषी महाविद्यालयात नामांकित इमार्टिकस कंपनीकडून कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले. या प्लेसमेंट प्रक्रियेत महाविद्यालयातील भक्ती सुरेश चौधरी, वैष्णवी रमेश वाघ, राजेश्वरी प्रभू जाधवर, राजश्री लक्ष्मीकांत पाठक, सौरभ हनुमंत मदने, प्रीती प्रवीण पाटील, शिवानी सुधीर गव्हाणे, आश्लेषा सुरेश गोरे या आठ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली.या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचेअभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील व करण पाटील यांनी केले.
या प्रसंगी ज्ञानेश खोत (महाराष्ट्र हेड, इमार्टिकस कंपनी) यांनी विद्यार्थ्यांना करिअर संधी, उद्योगातील अपेक्षा व कौशल्यविकासाबाबत मार्गदर्शन केले. तर हेमंत जगताप (मॅनेजर, इमार्टिकस कंपनी) यांनी निवड प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. आर. शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एच. पाटील होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी थेट संपर्क मिळतो व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, असे प्रतिपादन केले. या कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून महाविद्यालयाच्या प्लेसमेंट उपक्रमांना सकारात्मक चालना मिळाली आहे. यावेळी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, डॉ. ए. ए. गांधले, प्रा. एस. एन. पाटील एन. ए. मुंढे, एम. टी. लोंढे व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
