कळंब (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजी नगर सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त 6 डिसेंबर 2025 रोजी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन रासेयो विभाग प्रमुख प्रा.मनिषा कळसकर व आयक्युएसी विभाग प्रमुख डॉ.अनिल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी डॉ.उद्धव गंभिरे प्रा.पंडित शिंदे,डॉ.अनंत नरवडे,डॉ.रघुनाथ घाडगे, डॉ.हंडीबाग,प्रा.राजाभाऊ चोरघडे, प्रा.सोमनाथ कसबे, प्रा. अमोल शिंगटे,डॉ.विद्युलता पवार, प्रा.सुनिता चोंदे, श्री.विठ्ठल फावडे, श्री. संजय शेंडगे,सुंदर कदम,दत्तात्रय गायकवाड,दत्ता कांबळे, मुरलीधर चोंदे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य केले.