भुम (प्रतिनिधी)- आज अलंप्रभु यात्रेनिमित्त आलेल्या सर्व परगावून आलेले दुकान मालक यांच्या लहान मुल, स्त्रिया आणि तरुण यांना संदीप बागडे राज्य मंडळ सदस्य भारतीय मानवाधिकार परिषद महाराष्ट्र आणि कपडा बँकेतर्फे आज पहिल्या दिवशी जवळजवळ 7 ते 8 हजार लहान मुलांचे स्वेटर्स, शर्ट पॅन्ट मुलींचे घागरे, पंजाबी ड्रेस, जीन्स पॅन्ट, महिलांना साड्या तसेच वृद्ध महिला आणि पुरुष यांना स्वेटर्स आणि ब्लँकेट कपड्यांचे वाटप करण्यात आले
कपडा बँक मागील आठ वर्षापासून यात्रेतली माणसे, वीट भट्टी कामगार असो पूरग्रस्त असो किंवा गरजवंत असतील यांना सातत्याने कपडा वाटप करत आहे. आत्तापर्यंत जवळजवळ तीन लाखापर्यंतचे कपडे कपडा बँकेमार्फत वाटप करण्यात आले आहे. आपल्या घरातील चांगले वापरण्यायोग्य कपडे लोक कपड्या बँकेत आणून जमा करतात. आम्ही ते गरिबापर्यंत आणि गरजवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. यास कपडा बँकेला कपडा बँकेचे निर्माते बघते बख्तित्यार काजी, फैजान काजी आणि इतर अनेक मंडळींचे सहकार्य लाभते. तरी आपण आपल्याकडील स्वेटर्स, मफलर, ब्लँकेट, कान टोपी असतील तर ते कपडा बँकेत जमा करावेत असे आवाहन संदीप राघवेंद्र बागडे कपडा बँक करत आहे.
