भूम  (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी (ता.भूम) पालक मेळावा शनिवारी दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला. 

या पालक मेळाव्यास संबोधित करताना  प्रा. महावीर जालन म्हणाले की, गावोगावच्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत. याच जिल्हा परिषद शाळेतून गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण याठिकाणी घेता येत आहे. विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तक, गणवेश मिळतात. विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास हित होतो. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांबरोबर पालकांनी ही विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  मुख्याध्यापक संजय क्षीरसागर, तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास आहेर व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत रोटे होते.यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं.त्यानंतर जिल्हास्तरिय  आयोजित पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती पहिल्या सराव परीक्षामध्ये श्रावणी साळुंके,स्वरित साळुंके, श्रेया  रोटे, प्रतिभा अहिरे यांनी यश संपादन  केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या पाठोपाठ पालकांनाचे मनोगत व संवाद साधण्यात आला. या मेळाव्यात विद्यार्थी आरोग्य, शिक्षण, शिस्त,गुणवत्ता या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी शाळेचे सहशिक्षक बालाजी कुटे,सोमनाथ तौर,संघ लोखंडे,रुपाली गवळी,सविता गिरी, श्रीमती आहेर ,शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शिशुपाल साळुंके, सदस्य लक्ष्मण आहेर, रेवन साळुंके,गणेश रोटे, हनुमंत आहेर, विशाल जालन,रगुनाथ आहेर, समाधान जालन, अंगणवाडी सेविका सविता जालन,स्वाती जालन,राजश्री चव्हाण,अश्विनी जालन,अर्चना कावळे, राणी साळुंके,,उषा फरतडे, पुनम आहेर, उषा महामुनी आदी माता पालक उपस्थित होत्या.सूत्रसंचालन सोमनाथ तौर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संजय क्षीरसागर यांनी मानले.

 
Top