उमरगा (प्रतिनिधी)-  कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे सीएटीसी 230 कँप दि.24 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2025 रोजी वार्षिक शिबिर संपन्न झाले. 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांच्यावतीने या कँपचे आयोजन करण्यात आले होते. कमान अधिकारी कर्नल संतोष नवगण व कर्नल वाय. बी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा कँप पार पडला. यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाचे घवघवित यश प्राप्त केले आहे.

या कँप मध्ये कर्नल संतोष नवगण यांनी कॅडेटसना चरित्र, नेतृत्व, देशभक्ती, शिस्त, एकता, अनुशासन, फायरिंग, ड्रिल, कवायत, खेळ, फायरिंग, प्लॅग एरिया, सांस्कृतिक कार्यक्रम आदी गुणांचा अंगीकार करून राष्ट्राच्या उभारणी मध्ये हातभार लावण्याचे आव्हान केले. कँप दरम्यान झालेल्या विविध क्षेत्रात अति विशिष्ट कार्य केलेल्या कॅडेसटना प्रमाणपत्र, मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मुलीमध्ये बेस्ट कॅडेट इन कँप वैभवी शेंडगे, उत्कृष्ट खेळाडु सुशांत जाधव व सानिया शेख , गार्ड ऑफ ऑनर सुशांत जाधव , वैभवी शेंडगे, प्रेम बेरड, वैष्णवी कांबळे पायलटिंग पंकज जमादार, कृष्णा जमादार, सानिया शेख व्हॉलीबॉल प्रेम बेरड,पंकज जमादार, कृष्णा जमादार, राम ममाळे, सुशांत जाधव, वैभवी शेंडगे, सानिया शेख, वैष्णवी कांबळे या सर्व कॅडेटसनी वेगवेगळ्या क्षेत्रात घवघवित यश संपादन करून महाविद्यालयाचा दबदबा कायम राखला.

या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी सुभेदार मेजर शंभू सिंग, उत्तम पाटील, बाजीराव पाटील तसेच सर्व पीआय स्टाफ व एनसीओ , जेसिओ बटालियनचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष आश्लेष मोरे सर्व संचालक मंडळ प्राचार्य डॉ संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, डॉ पदमाकर पिटले कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले व सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 
Top