धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला नवचैतन्य मिळणार असल्याचे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या कार्याचा गौरव करून, संघटनेला पक्षाच्या वतीने पुन्हा पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यस्तरावर हा सेल पुन्हा कार्यरत व्हावा यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांपर्यंत संघटनेच्या मागण्या पोहोचविण्यास स्वतः पुढाकार घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार विलास अण्णा सांजेकर, अण्णासाहेब गायकवाड,अक्षय साळुंखे तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
