धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदू खाटिक आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन) यांच्या माध्यमातून सन 2025-26 करिता विशेष घटक योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत असून, इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विशेष घटक योजना (सन 2025-26 — उद्दिष्ट 5 लाभार्थी) 

या योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा  50,000 रुपयांपर्यंत आहे.प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते,तर उर्वरित 50 टक्के रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते.(उदा 25,000 रुपये अनुदान व 25,000 रुपये बँक कर्ज).बँकेच्या नियमांनुसार व्याज आकारले जाते व कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे तीन वर्षांच्या आत करावी लागते.

बीजभांडवल योजना (सन 2025-26 — उद्दिष्ट 5 लाभार्थी)

या योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 5 लाखापर्यंत असून,प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के रक्कम बीजभांडवल कर्जाच्या स्वरूपात महामंडळामार्फत 4 टक्के वार्षिक व्याजदराने देण्यात येते.या राशीमध्ये 50,000 रुपये इतक्या अनुदानाचा समावेश आहे. बँकेकडून प्रकल्पाच्या 75 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात देण्यात येते. बँक व महामंडळाचे कर्ज समान मासिक हप्त्यांमध्ये तीन ते पाच वर्षांच्या आत परतफेड करणे आवश्यक आहे.अर्जदाराचा स्वतःचा सहभाग 5 टक्के ठेवण्यात आलेला आहे.म्हणजेच,प्रकल्पात बँक कर्ज 75 टक्के महामंडळाचे योगदान 20 टक्के व अर्जदाराचा सहभाग 5 टक्के असे एकूण 100 टक्के वित्तपुरवठा होतो.

अर्ज प्रक्रिया : इच्छुक अर्जदारांनी स्वतःच्या ई-मेल अकाउंटचा वापर करून https://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.अर्जाची मूळ प्रत तसेच आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती अर्जदारांनी स्वतः जिल्हा कार्यालयात सादर कराव्यात.त्रयस्थ व्यक्तीकडून अर्ज अथवा वैधानिक दस्तऐवज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी जिल्हा व्यवस्थापक,हिंदू खाटिक आर्थिक विकास महामंडळ (म.),डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,तळ मजला,धाराशिव येथे संपर्क साधावा.


 
Top