धाराशिव (प्रतिनिधी)- भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने तुळजापूरमधून ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे पथक पेट्रोलिंग करत पोस्टे तुळजापूर हद्दीत असताना गुप्त बातमीवरून माहिती मिळाली की, भररदिवसा व्यावसायिकाला लुटणारा गुन्ह्यातील आरोपी व गेलेला माल तुळजापूरमध्ये आहे. असे समजल्यावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तुळजापूर येथुन आरोपी मनोज उर्फ पापा महादेव धोत्रे वय 30 वर्ष, रा. वेताळ नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यास ताब्यात घेतले. त्याचे कडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा मी माझा साथीदार यांनी मिळून केल्याचे सांगितले. त्यावर पथकाने नमुद आरेापीच्या ताब्यातुन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून नमुद आरोपी पुढील तपास कामी पोलीस ठाणे तुळजापूर येथे रिपोर्ट सह हजर केले.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोह- राहुल नाईकवाडी, समाधान वाघमारे, बळीराम शिंदे, अशोक ढगारे, चालक विनायक दहिहांडे, योगेश कोळी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोअं सुर्यवंशी, भोसले यांच्या पथकाने केली आहे.
