वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची 108 वी जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम, प्रा.शाम डोके, व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.अशोक कदम यांनी आपल्या मनोगतामध्ये इंदिरा गांधी चे भारतासाठीचे योगदान नमूद केले यामध्ये प्रामुख्याने त्यांची निर्णय क्षमता किती कणखर होती हे त्यांनी वेगवेगळे उदाहरण देऊन स्पष्ट केले.बांगलादेशाची निर्मिती असो कि पाकिस्तान विरुद्ध चे युद्ध असो ते कोणतेही निर्णय घेतला कि मागे घेत नसत. भारतीय राजकारणाची जाण असलेली, तळागाळातील लोकांच्या अडचणी जाणणाऱ्या व आपल्या पराभवातून सुद्धा पुन्हा जनमाणसामध्ये एक आढळ स्थान निर्माण करण्याऱ्या अश्या थोर इंदिरा गांधी होत्या लोक त्यांना याच निर्णय क्षमतेमुळे आयर्नलेडी असे संबोधत असत. असे ते म्हणाले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.राहुल कुलकर्णी यांनी केले सूत्रसंचालन प्रा.शाम डोके यांनी केले तर आभार प्रा.अजितकुमार तिकटे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.
