धाराशिव  (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार,नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान केंद्र शासनाच्या / निकषांनुसार तपशीलवार प्रस्तावासहित सादर करणे आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने,जिल्ह्यात अलीकडील अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे अनेक गावांतील शेतीपिके आणि सार्वजनिक मालमत्ता मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे.या नुकसानीची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये 14 ऑक्टोबर 2025 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले आहेत.

या विशेष ग्रामसभांमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे 33 टक्क्यांहून अधिक बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या वाचण्यात येणार आहेत.तसेच गावातील सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान,खुराडे गेलेली जनावरे,मृत जनावरे,घर पडझड,पाण्याने घरात शिरून झालेले नुकसान अशा विविध घटकांबाबतची माहिती ग्रामसभेमध्ये मांडली जाईल. जिल्हा प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना या ग्रामसभा वेळेत व नियमपूर्वक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


 
Top